स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

प्रस्तावना, भौगोलिक स्पष्टीकरण

views

6:05
आपण आपल्या दिवसभराची कामे वेळेनुसार करीत असतो. उदा: सकाळी लवकर झोपेतून उठतो. त्यानंतर ठरावीक वेळेने आपण आपली ठरावीक कामे करीत असतो. रात्री आपण झोपत असतो. हे सर्व आपण ठरलेल्या वेळेतच करीत असतो. मग ही वेळ आपण कशावरून ठरवितो याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, अंघोळ करतो, नाश्ता करून शाळेला जातो. वर्गात आपल्याला शिकवले जाते ते आपण समजून घेतो व परत घरी येतो. त्यानंतर सायंकाळी मैदानावर खेळण्यासाठी जातो. खेळून आल्यानंतर जेवण करून दात घासून आपण झोपी जातो. दिवसभरात आपण अशा विविध कृती करत असतो. पण मुलांनो, आपण आपल्या दिवसभराची कामे वेगवेगळ्या वेळेनुसार करतो. त्यासाठी आपण ठरावीक वेळेत ठरावीक कामेच करीत असतो. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. उदा: झाडांची सावली, माणसांची सावली इ. तसेच निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करत असत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीत सूर्य आकाशात असल्याने आपल्याला उजेडाचा अनुभव येत असतो. त्यामुळे या कालावधीस दिनमान असे म्हणतात. याउलट सूर्यास्तानंतर पुढच्या सूर्योदयापर्यंत आकाशात सूर्य दिसत नाही. त्यावेळी आपल्याला अंधार जाणवतो. या अंधाराच्या कालावधीस रात्रमान असे म्हणतात. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने तसेच घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इ. साधने वापरून वेळ सांगितली जात असे.