स्थानिक वेळ व प्रमाण वेळ Go Back हे नेहमी लक्षात ठेवा views 3:18 1) पृथ्वीला एक परिवलन म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात. 2) पृथ्वीला ३६०० अंशाची फेरी पूर्ण करण्यसाठी २४ तास लागतात. म्हणजेच ती एका तासात ३६० अंश ÷ २४ =१५ अंश ती स्वत:भोवती फिरते. 3) म्हणजेच पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ६० मिनिटे ÷ १५ अंश = ४ मिनिटे लागतात. 4)म्हणजेच प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो. आपल्याला मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. उदा:1) इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे ६०० पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनीचला दुपारचे १२ वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा: विधान: मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ४ मिनटांनी वाढते. ग्रीनीच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तावरील फरक ६०० आहे. एकूण वेळेतील फरक= ६० × ४ = २४० मिनिटे = २४० ÷ ६० मिनिटे = ४ तास म्हणजे मशाद येथे दुपारचे ४ वाजलेले असतील. प्रस्तावना, भौगोलिक स्पष्टीकरण करून पहा स्थानिक वेळ जरा विचार करा हे नेहमी लक्षात ठेवा सांगा पाहू ! प्रमाण वेळ भारतीय प्रमाणवेळ माहीत आहे का तुम्हांला ?