चला, वजाबाकी करूया!

प्रस्तावना चला, वजाबाकी करूया!

views

4:19
चला वजाबाकी शिकू: शि: मुलांनो, आपण बेरीज करायला शिकलो. आता आपण वजाबाकी करूया. वजाबाकी म्हणजे कमी करणे. समजा माझ्याकडे चार चॉकलेटं आहेत. मी दोन चॉकलेटं रमाला दिली. तर माझ्याकडे दोन चॉकलेट राहिली. शि: बरोबर! आता समजा, माझ्या हाताची ५ बोटे म्हणजे यशकडची ५ जांभळे आहेत. त्यातून यशने रमाला २ जांभळे दिली. म्हणून मी यातील २ बोटे कमी करते. ५, ४. पहा, किती बोटे शिल्लक राहिली. वि: ३ शि: बरोबर! म्हणजेच यशकडे ३ जांभळे शिल्लक राहिली. आता हेच उदाहरण आपण आणखी एका पद्धतीने सोडवू. ही पहा फळ्यावर मी ५ जांभळे म्हणजे ५ गोल काढते. त्यातून आता आपण दोन जांभळे रमाला देऊ. म्हणजेच यातील २ गोल खोडून काढू. १,२. पाहिलंत इथेही ३ च गोल शिल्लक राहिले. म्हणजेच यशकडे ३ जांभळे शिल्लक राहिली. मुलांनो, वजाबाकी करताना हे लक्षत ठेवा की, मोठी संख्या असेल तितके गोल काढा. आणि त्यातून दुसऱ्या लहान संख्याएवढे गोल खोडून टाका म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर मिळेल.