चला, वजाबाकी करूया!

वाचा आणि सोडवा.

views

2:26
वाचा आणि सोडवा : शि: मुलांनो, आता आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव करूया. (इथे पान क्र.36 वरील वजाबाकीची शाब्दिक दाखवा त्याचप्रमाणे प्रत्येक गणित उभ्या मांडणीतही दाखवा.) उदा.१) नगमाकडे ५ बोरे होती. तिने ३ बोरे सलमाला दिली. आता नगमाकडे किती बोरे उरली? शि: पहा मुलांनो नगमाकडे असलेली एकूण बोरे आहेत ५. त्यांपैकी तिने सलमाला दिलेली बोरे आहेत. 3. म्हणजे तिच्याकडची बोरे कमी झाली. म्हणून आपण इथे वजाबाकी करू. तर ५ मधून ३ बोरे कमी केली तर ५,४,३. म्हणजे पहा. १,२ बोरे शिल्लक राहिली. उदा.२) टोपलीत ९ सीताफळे होती. दादाने त्यांतील ६ सीताफळे मित्रांना खाण्यासाठी वाटली, तर टोपलीत किती सीताफळे शिल्लक राहतील? शि: टोपलीतील सीताफळे आहेत ९. त्यातील वाटलेली सीताफळे आहेत ६. म्हणजे शिल्लक राहिली एकूण ३ सीताफळे. उदा.३) समीराकडे ३ पेन्सिली होत्या. सामीराने १ पेन्सिल मैत्रिणीला दिली, तर समीराकडे किती पेन्सिली उरल्या? शि: समीराकडील पेन्सिल ३, मैत्रिणीला दिलेली पेन्सिल १. म्हणून उरलेल्या पेन्सिली आहेत २. उदा.४) डब्यात ४ लाडू होते, त्यांतील १ लाडू बलबीरने खाल्ला, तर आता डब्यात किती लाडू उरले? शि: मुलांनो, डब्यात असलेले लाडू ४, बलबीरने खालेला लाडू १. म्हणून डब्यात शिल्लक लाडू राहिले ३.