चला, वजाबाकी करूया!

वजाबाकीची उदाहरणांचा सराव

views

4:01
आता आपण आणखी वजाबाकीच्या उदाहरणांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरु करूया. वि: हो, बाई. शि: आता ही चित्रे बघा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. या तीन स्माईलींमधून १ स्माईली कमी केली तर किती स्माईली शिल्लक राहतील? वि: बाई, ३ – २ = १ स्माईली शिल्लक राहिली. शि: बरोबर! आता दुसरे चित्र पहा आणि मला सांगा ४ चांदण्यांमधून २ चांदण्या गेल्यावर किती चांदण्या उरतील? वि: बाई, चार मधून दोन चांदण्या गेल्यावर दोन चांदण्या शिल्लक राहतील. शि: शाब्बास! आता ह्या चित्रात सांगा पाहू पाच मधून दोन वजा केल्यावर किती उरले? वि: बाई, पाच मधून दोन गेल्यावर तीन उरले. शि: छान! आता हे शेवटचे चित्र पहा आणि मला सांगा तीन त्रिकोणांमधून दोन त्रिकोण वजा केले तर किती त्रिकोण उरतील? वि: बाई, तीन मधून दोन त्रिकोण वजा केले तर एक त्रिकोण शिल्लक राहील. शि: अगदी बरोबर उत्तरे दिलीत सर्वांनी.