नाणी व नोटा

प्रस्तावना नाणी व नोटा

views

4:06
नाणी व नोटा: शि: मुलांनो, आज आपण नाणी व नोटा यांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला तुमचे आई – बाबा खाऊ आणण्यासाठी पैसे देतात किंवा तुमच्याकडे पाहुणे आल्यावर तुम्हाला खाऊसाठी पैसे देतात. मग तेच पैसे घेऊन तुम्ही दुकानात जाता आणि चॉकलेट घेता. तर आज आपण याच पैशांचा, म्हणजेच नाणी व नोटा यांचा अभ्यास करणार आहोत. वि: हो, बाई. शि: मुलांनो, ओळखा पाहू हे नाणे कितीचे आहे? वि: बाई, हे एक रुपयाचे नाणे आहे. शि: शाब्बास! मग हे किती रुपयांचे नाणे आहे? वि: बाई, हे दोन रुपयांचे नाणे आहे. शि: छान! हे किती रुपयांचे नाणे आहे? वि: हे पाच रुपयांचे नाणे आहे. शि: अगदी बरोबर ओळखलंत सगळ्यांनी! ज्या प्रकारे तुम्ही नाणी ओळखलीत त्याचप्रमाणे आता मला या नोटा ओळखून दाखवा बरं. तर आता मी तुम्हाला काही नोटा दाखवते. सांगा पाहू त्या कितीच्या नोटा आहेत? शि: मुलांनो, ओळखा पाहू ही कितीची नोट आहे? वि: बाई ही १ रुपयाची नोट आहे. शि: छान! आता ही किती रुपयांची नोट आहे? वि: बाई, ही पाच रुपयांची नोट आहे. शि: बरोबर! मग आता ही किती रुपयांची नोट आहे? वि: बाई, ही दहा रुपयांची नोट आहे. शि: अरे व्वा! तुम्हाला तर सर्व नोटा बरोबर ओळखता आल्या.