नाणी व नोटा

वस्तू खरेदीसाठी नाणी व नोटा

views

3:43
वस्तू खरेदीसाठी नाणी व नोटा: मुलांनो, या पहा या काही वस्तू आहेत. त्या खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या नाणी किंवा नोटा द्याल हे सांगा बरं! शि: वस्तू आहे पार्ले बिस्कीटचा पुडा आणि त्याची किंमत आहे ३ रुपये. वि: बाई एक रुपयाची तीन नाणी किंवा २ रुपयांचे एक नाणे आणि १ रुपयाचे एक नाणे देता येईल. शि: बरोबर! आता वस्तू आहे पुस्तक आणि त्याची किंमत आहे १२ रुपये. वि: बाई १० रुपयांची एक नोट आणि २ रुपयांचे एक नाणे देता येईल.शि: छान! आता वस्तू आहे पाण्याची बाटली आणि त्याची किंमत आहे १८ रुपये. वि: बाई १० रुपयांची एक नोट, ५ रुपयांचे एक नाणे, २ रुपयांचे एक नाणे आणि १ रुपयाचे एक नाणे देता येतील. शि: शाब्बास अगदी बरोबर उत्तरे दिलीत. अगदी बरोबर! म्हणजे तुम्हाला आता नाणी व नोटांच्या मदतीने वस्तूची किंमत काढणे जमले आहे. शि: छान! आता शेवटचा प्रश्न: अजहरने १० रुपयांची एक नोट व १० रुपयांचे एक नाणे देऊन वही घेतली तर वहीची किंमत किती असेल? वि: बाई, अजहरने १० रुपयांची एक नोट व १० रुपयांचे एक नाणे देऊन वही घेतली तर वहीची किंमत वीस रुपये होईल. शि: अगदी छान उत्तरे दिलीत तुम्ही. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण नाणी आणि नोटा यांचा वापर शिकलो.