आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

लोकसंख्येची वाढ

views

4:18
लोकसंख्येची वाढ :- मुलांनो, आधुनिक काळात आपल्या देशातील लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या लोकसंख्या वाढीचाही वाईट परिणाम मानव व इतर सजीवसृष्टीवर होत आहे. १९५१ साली देशातील भारतातील जनगणना झाली, त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे ३६ कोटी होती. आणि २०११ साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १२१ कोटी होती. म्हणजे आपल्या लक्षात येते की, आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे. अजूनही त्यात वाढ होतच आहे. आपल्याला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तूंची मागणी या लोकसंख्या वाढीमुळे खूप वाढली आहे. शहरात जागा नाही. म्हणून शहरातील लोकांनी शहराच्या आसपासच्या परिसरात घरे बांधली. त्यामुळे त्यांना त्या परिसरातून मुख्य शहरात कामावर जाण्यासाठी खूप मोठे अंतर पार करावे लागू लागले. म्हणून शहरातील लोक मोटार सायकल, कार यांसारखी वाहने खरेदी करू लागले. लोकसंख्या वाढल्यामुळे कधीकधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडते. त्यामुळे मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी पाणी साचते. अशा दूषित व घाण पाण्यात डासांची वाढ लगेच होते. डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या रोगांचा प्रसार होतो.