आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

जमिनीतील पाणी आटत चालले

views

4:39
जमिनीतील पाणी आटत चालले.:- मुलांनो, प्राणी, कीटक, वनस्पती, मानव या सर्वांसाठी पाणी हे अत्यंत गरजेचे आहे. पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाहीत. इतर सजीव पाणी जास्तीत जास्त पिण्यासाठी वापरतात. परंतु, मानवाला पाणी अनेक कारणांसाठी लागते. शारीरिक स्वछता, घराची स्वच्छता, कपडे धुणे, भांडी धुणे यासाठी, पिण्यासाठी, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे, बांधकाम, वीजनिर्मिती अशा सर्व कामांसाठी माणूस पाण्याचा वापर करतो. माहीत आहे का तुम्हाला ?: मुलांनो, आपण जर आदिमानवापासूनचा माणसाचा इतिहास पाहिला तर आपल्याला दिसून येईल की फार पूर्वीपासून मानवाने जिथे पाणी उपलब्ध असेल अशाच ठिकाणी वस्ती केली आहे. आज जर आपण अनेक मोठमोठी शहरे पाहिली तर ती नदीकाठांवर वसलेली दिसून येतात.