शिवरायांची युद्धनीती

सरदारांची स्वामीनिष्ठा

views

4:40
सरदारांची स्वामीनिष्ठा :- मुलांनो, युद्धात यश मिळण्यासाठी जसा सेनानायक पराक्रमी असावा लागतो, तसेच त्याला साथ देणारे सैन्यही प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी व स्वामीनिष्ठा असणारे असावे लागते. . सरदारांची शिवरायांवर फार निष्ठा होती. त्यातील एक निष्ठावंत सरदार म्हणजे वीर बाजी पासलकर हे होत. ते अत्यंत शूर होते. स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे ते सेनापती होते. विजापूरच्या आदिलशाहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन १६४८ मध्ये फत्तेखानास स्वराज्यावर पाठविले. फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील शुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिला पराभव होता. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांना बेलसरच्या छावणीवर पाठविले. या सर्वांनी अचानक छावणीवर हल्ला करून फत्तेखानाला पराभूत केले, परंतु यात स्वराज्याचा एक हिरा धारातीर्थी पडला. तो म्हणजे वीर बाजी पासलकर होय. दुसरे स्वामिनिष्ठावंत म्हणजे कान्होजी जेधे होत.