शिवरायांची युद्धनीती Go Back शिवरायांचा गनिमी कावा views 3:19 शिवरायांचा गनिमी कावा :- महाराजांच्या या यशात सर्वात मोठा वाटा कशाचा असेल तर त्यांच्या युद्ध करण्याच्या तंत्राचा म्हणजेच गनिमी काव्याचा होय. आदिलशाहा, मुघल हे सर्व महाराजांचे शत्रू महाराजांपेक्षा कितीतरी मोठे व अफाट सैन्य असलेले होते. लाखोंनी सैन्य त्यांच्याजवळ होते. महाराजांचे सैन्य हे काही हजारांच्या घरात होते. शत्रूजवळ तोफा व भरपूर दारूगोळा होता, आणि महाराजांकडे थोडे सैन्य व कमी युद्ध साहित्य होते. एवढे कमी साहित्य व कमी सैन्य घेऊन ते एवढ्या मोठ्या सैन्याशी कसे लढणार? उघड्य़ा मैदानावर शत्रूशी सामना करणे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा शिवरायांनी विचार केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ प्रदेश आहे. आपल्या प्रदेशात डोंगर, घाट, खिंडी भरपूर प्रमाणात आहेत. शत्रूशी लढताना आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग होईल, हे विचारात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यायचा हे त्यांनी ठरविले. अंधारात शत्रूला काय होत आहे हे कळून ते युदधाला तयार होण्यापूर्वीच ते वेगाने निघून जात व दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपूनछपून लढाया करायला शिवरायांनी सुरूवात केली. यालाच ‘गनिमी कावा’ असे म्हणतात. शिवरायांनी याच युद्धतंत्राचा वापर करून बादशाहाच्या प्रचंड फौजांचा अक्षरश धुव्वा उडविला. अनेक अडचणींच्या वेळी शत्रूला पराभूत करण्यासाठी महाराजांनी नेहमी याच तंत्राचा वापर केला. प्रस्तावना सरदारांची स्वामीनिष्ठा शिवरायांचा गनिमी कावा डोंगरी किल्ले