गुणाकार: भाग २

तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे

views

4:31
. तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे:मुलांनो, आता आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे ते पाहूया. ज्या पद्धतीने आपण दोन अंकी संख्येला गुणून गुणाकार करतो, त्याच पद्धतीने तीन अंकी संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. चला तर मग, तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणूया.७०९ x ४६ चा गुणाकार करूया. प्रथमत : ६ एककाने ९ एककाला गुणू. ६ नवे चोपन्न. ५४ म्हणजे ५ दशक आणि ४ एकक. यातील ५ हे वर दशकात लिहू. व ४ उत्तरात एककात लिहू. आता ६ ने शून्याला गुणू. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो. म्हणून जो हातचा ५ आहे तो तसाच खाली उत्तरात लिहू. आता ६ एककाने ७ शतकाला गुणू. ६ × ७ =४२. म्हणून ७०९ x ६ यांचा गुणाकार ४२५४ झाला. आता एककस्थानी शून्य लिहू, कारण ४ हे दशक स्थानी आहेत म्हणून आता ४ दशकाने ९ एककाला गुणू. चार नवे ३६. हे ३६ म्हणजे ३ शतक व ६ दशक आहेत. म्हणून ३ वर शतकात लिहू. आणि ६ दशकात उत्तरात . आता ४ ने ० ला गुणू. ४ शून्य शून्य. म्हणून हातचा ३ तसाच खाली घेऊ. आता ४ दशकाने ७ शतकाला गुणू. ४ साते २८. या २८ मध्ये ८ हे हजार असून २ हे दशहजार आहेत. म्हणून त्यांना तसेच खाली उत्तरात लिहिले. पहा ७०९ x ४० यांचा गुणाकार २८३६० झाला. आता ४२५४ व २८,३६० यांची बेरीज करू. ती झाली ३२६१४. म्हणून ७०९ x ४६ यांचा गुणाकार ३२६१४ येतो.