संदेशवहन व प्रसार माध्यमे

प्रस्तावना

views

3:32
मुलांनो आजच्या आधुनिक युगात संदेशवहनाचा व त्याच्या साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संदेशवहन म्हणजे ज्ञानाची किंवा माहितीची देवाण घेवाण होय. आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अगदी कमी वेळात संपर्क साधणे शक्य झाले आहे. संदेशवहनाची विविध प्रकारची साधने आहेत. उदा.दूरदर्शन, रेडिओ, टपाल, टेलिफोन, मोबाईल इत्यादी. तसेच प्रसारमाध्यमांद्वारेही संदेशवहन होते. म्हणजेच वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला जगातील कानाकोप-यांतील माहिती मिळते. ती कशाप्रकारे मिळते तेच आपण या पाठात पाहाणार आहोत. मुलांनो, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांवर विविध प्रकरचे कार्यक्रम पाहात असाल. हे कार्यक्रम पाहात असताना तुम्हांला प्रश्न पडतो का की हे कोठून येतात? किंवा हे कार्यक्रम आपल्याला कसे दिसतात? तसेच आपण मोबाईलवरून इतरांशी बोलतो. आपल्या मोबाईलला कोणत्याही प्रकारची वायर किंवा तार नसते. तरीही आपण एकमेकांशी कसे बोलत असू? असे प्रश्न तुमच्या मनातही निर्माण झाले असतील ना? तर आता आपण यांचीच उत्तरे पाहू.