संदेशवहन व प्रसार माध्यमे

माहीत आहे का तुम्हांला

views

4:16
मुलांनो आपल्या देशात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट (INSAT – Indian National Satellite) या नावाने ओळखले जातात. हा पहा, एक अग्निबाण प्रक्षेपित होताना दिसतो आहे. या अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात व त्यांचा उपयोग संदेशवहनासाठी केला जातो. मुलांनो, तुमच्या प्रत्येकाच्या घरी एक तरी स्मार्ट फोन असेल. त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारखी अॅप्स असतात. त्यात तुम्हांला अनेक प्रकारचे संदेश (मेसेजेस) येतात. ते तुम्ही एकमेकांना पुढे पाठवत असता. म्हणजेच मोबाईल हे संदेशवहनाचे एक आधुनिक साधन आहे. तसेच माहितीचे प्रसारण करणे हा संदेशवहनाचा भाग आहे. उदा. टीव्ही. रेडिओ, वृत्तपत्रे यांच्यामार्फत आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळत असते. ती माहिती एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहचत असते. या मिळालेल्या माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी केला जातो.