संदेशवहन व प्रसार माध्यमे

काय करावे बरे?

views

3:36
मुलांनो तुमच्याच वयाचा व पाचवीत शिकणारा आमोद नावाचा मुलगा शाळेतून घरी आला, की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे (website) पाहतो. टीव्हीवरील त्याच्या सर्व आवडीचे कार्यक्रमही तो न चुकता रोज बघतो. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. मैदानावर खेळण्यासाठी जात नाही. हे नेहमी लक्षात ठेवा :- संदेशवहन व माहीती प्रसारण साधनांचा नेहमी काळजीने वापर करावा. आवश्यकतेनुसार व गरजेपुरताच त्यांचा वापर करावा. त्यांचा गरजेपेक्षा जास्त व सतत विनाकारण वापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माहीत आहे का तुम्हांला ? – मुलांनो, दृक म्हणजे दिसणारे व श्राव्य म्हणजे ऐकता येणारे किंवा ऐकावेसे. जसे की रेडिओ हे श्राव्य साधन आहे. म्हणजे आपण रेडिओ ऐकू शकतो. त्यातील गोष्टी पाहू शकत नाही. तर वृत्तपत्रे ही दृक साधने आहेत. म्हणजेच ती आपण पाहू शकतो. पण ऐकू शकत नाही. तर दूरदर्शन हे दृक व श्राव्य या दोन्ही प्रकारचे साधन आहे. म्हणजेच, आपण दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूही शकतो व ऐकूही शकतो. मुलांनो, आज आपण या पाठातून पुढील गोष्टींचा अभ्यास केला: १) संदेशवहनाची साधने कोणकोणती आहेत, त्यांची ओळख आपण या पाठातून करून घेतली. २) संदेशवहन करण्याकरिता अवकाश प्रक्षेपणतंत्राचा कशाप्रकारे वापर केला जातो, याची माहिती घेतली.