भागाकार: भाग 2 Go Back शाब्दिक उदाहरणे: views 2:47 शाब्दिक उदाहरणे: मुलांनो आता आपण भागाकाराची शाब्दिक उदाहरणे सोडवूया. उदा.१) प्रत्येक मूलाला ४ याप्रमाणे १४८ गोट्या वाटल्या तर किती मुलांना गोट्या वाटता येतील? उत्तर :- मुलांची संख्या ४ व गोट्यांची संख्या १४८ आहे. याचा अर्थ १४८ ला ४ ने भाग द्यावा लागेल. हे पहा, प्रथम १ शतकाला भाग देऊ .४ च्या पाढ्यात १ येत नाही. ४ हे १ पेक्षा मोठे आहेत. अशा वेळी शून्याने भाग देऊ. वर शून्य लिहू व १ मधून शून्य वजा करू १ उरेल. आता ४ दशक खाली घेऊ. १४ दशक तयार झाले. ४ च्या पाढ्यात १४ येत नाहीत.१४ पेक्षा जवळची लहान संख्या १२ आहे. चार त्रिक१२ म्हणून ३चा भाग लावू व१४ मधून १२ वजा करू. २ उरले. ८ एकक खाली घेऊ. २८ एकक तयार झाले. चारच्या पाढ्यात २८ येतात. ४ साते २८ म्हणून ७ चा भाग लावू व २८ मधून २८ वजा करू. बाकी शून्य राहिले. भागाकार ३७ आला. म्हणून ३७ मुलांना १४८ गोट्या वाटता येतील. प्रस्तावना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे: सरावासाठी उदाहरणे: शाब्दिक उदाहरणे: