राष्ट्ररक्षक मराठे Go Back प्रस्तावना views 3:47 मागील पाठात आपण पाहिले की, शाहू महाराजांनी पेशवे पदी बाळाजी भट आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा बाजीराव यांना बसविले व त्यांच्या मदतीने स्वराज्याचा कारभार व्यवस्थित पार पाडला. बाजीरावाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब याला पेशवापद दिले. याच दरम्यान इराणचा नादिरशाहा याच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली. अशा परिस्थितीत नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेमध्ये मराठयांची सत्ता स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले. याच काळात अहमदशाह अब्दालीने पानिपतच्या रणांगणावर मराठयांसमोर आव्हान उभे केले. या सर्व घडामोडींची माहिती या पाठात घेणार आहोत. उत्तरेतील परिस्थिती: या प्रदेशात भारताच्या वायव्येला असलेल्या अफगाणिस्तानातून आलेले पठाण स्थायिक झाले होते. दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या मैदानी प्रदेशाला दोआब असे म्हणतात. मराठयांनी आपल्या पराक्रमाने रोहिल्यांचा बंदोबस्त केला. अफगाणांशी संघर्ष: अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. याने एकूण पाच वेळा भारतीय उपखंडावर आक्रमणे केली. इ.स. १७५१ मध्ये त्याने भारतावर केलेली स्वारी ही त्याची भारतावरील तिसरी स्वारी होती. प्रस्तावना अफगाणांशी संघर्ष – पुढील भाग: अटकेवर मराठयांचा ध्वज फडकला पानिपतचा रणसंग्राम पेशवा माधवराव मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुन:स्थापना