राष्ट्ररक्षक मराठे Go Back अटकेवर मराठयांचा ध्वज फडकला views 4:10 अटकेवर मराठयांचा ध्वज फडकला: अफगाणिस्तानातून आलेल्या पठाणांना रोहिले म्हणत. या रोहिल्यांचा प्रमुख सरदार नजीबखान हा होता. नजीबखानाला आपले म्हणजे अफगाणी लोकांचे-वर्चस्व निर्माण करायचे होते. नजीबखानाच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर आक्रमण केले. ही अब्दालीची भारतावरील पाचवी स्वारी होती. यावेळेस अब्दालीने दिल्ली जिंकली. तसेच मोठी संपत्तीची लूट घेऊन तो आपल्या देशात परत गेला. दत्ताजीचा पराक्रम: मराठयांनी दिल्लीबरोबर पंजाबही जिंकून घेतला होता. उत्तरेत पूर्ण वर्चस्व मराठयांचे निर्माण झाले होते. म्हणून पंजाबवरील आपली पकड घट्ट करण्यासाठी तसेच नजीबखानाला पराभूत करण्यासाठी पेशव्यांनी दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीबखानाने त्याला वाटाघाटीत व चर्चेत अडकवून ठेवले. नजीबखान रोहिल्याचा सरदार कुतुबशाह हत्तीवरून उतरून घायाळ झालेल्या दत्ताजीजवळ आला. त्याने दत्ताजीला विचारले “क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लढोगे?” दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता. पण कुतुबशाहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले. “हॉँ, बचेंगे तो और भी लढेंगे.” प्रस्तावना अफगाणांशी संघर्ष – पुढील भाग: अटकेवर मराठयांचा ध्वज फडकला पानिपतचा रणसंग्राम पेशवा माधवराव मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुन:स्थापना