समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

समप्रमाण

views

5:08
समप्रमाण (Direct Proportion) : मुलांनो, याआधी आपण दोन संख्यांची तुलना करून ती गुणोत्तराच्या रूपात कशी लिहितात ते पाहिले. आज आपण समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण समप्रमाण म्हणजे काय हे समजून घेऊया. पाहा, इथे वर्तुळांच्या काही आकृत्या दिल्या आहेत. या वर्तुळात दाखवलेल्या व्यासांमुळे वर्तुळाचे किती भाग झाले आहेत ते दाखवले आहे. आकृती A मध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. आकृती B मध्ये दोन व्यासांमुळे वर्तुळाचे 4 भाग झाले आहेत. आकृती C मध्ये तीन व्यासांमुळे वर्तुळाचे 6 भाग झाले आहेत. आकृती D मध्ये चार व्यासांमुळे वर्तुळाचे 8 भाग झाले आहेत.