समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

भागदारी

views

4:15
भागीदारी (partnership): मुलांनो, आता आपण भागीदारी म्हणजे काय हे जाणून घेऊ. एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी पैसे लागतात. त्या रकमेला भांडवल असे म्हणतात. अनेकदा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात. म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारी मध्ये व्यवसाय सुरू करतात. भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारीचे संयुक्त खाते असते. त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचे वाटप केले जाते. आता हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया.