समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

उदाहरण

views

5:26
उदा: सुरेश आणि रमेश यांनी 144000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला? उत्तर: या उदाहरणात 144000 या एकूण भांडवलावर 20% नफा म्हणजेच 100 वर 20 इतका नफा झाला. म्हणून प्रथम आपल्याला एकूण नफा काढून घ्यावा लागेल. एकूण नफा = (144000 x 20)/100 = 28800 रुपये मिळाला. इथे भांडवलाचे प्रमाण 4:5 दिले आहे आणि हा मिळालेला नफा त्या प्रमाणात वाटायचा आहे. म्हणून सुरेशचा नफा 4x आणि रमेशचा नफा 5x मानूया. आता मानलेला नफा आणि मिळालेला एकूण नफा यांची बेरीज करून घेवूयात, म्हणून 4x + 5x = 28800 म्हणून 9x = 28800 x = 28800/9 = 3200 आपल्याला x ची किंमत 3200 मिळाली आहे. म्हणून आता आपण सुरेश आणि रमेश यांचा नफा काढणार आहोत. सुरेशला मिळालेला नफा 4x आहे. म्हणजेच 4 x 3200 = 12,800 रुपये इतका आहे. आणि रमेशला मिळालेला नफा 5x आहे. म्हणून 5 × 3200 = 16,000 रुपये आहे. अशा प्रकारे सुरेशला 12800 आणि रमेशला 16000 रुपये नफा मिळाला.