स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

प्रस्तावना

views

3:07
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वातंत्र्यलढा अजूनही संपलेला नव्हता. १८ जुलै १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारतात असलेल्या अनेक संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते. संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. इंग्रज जरी भारतातील आपली सत्ता सोडून गेले असले तरी पोर्तुगीज आणि फ्रेंच या परकीय सत्तांनी भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती. हे आणि दुसरे अनेक प्रश्न भारतापुढे उभे होते. हे प्रश्न कसे सोडवले गेले. त्याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.