बैजिक राशींचे अवयव Go Back गुणोत्तरीय बैजीक राशी views 4:30 A आणि b या दोन बैजिक राशी असतील तर A/b या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतात. गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देताना कराव्या लागणाऱ्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया परिमेय संख्यांवरील क्रियांप्रमाणेच असतात. बैजिक राशींचे भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही. हे आपण उदाहरणांतून समजून घेऊ. उदा.1) सरळ रूप द्या: (a^2 + 5a + 6)/( a^2 - a – 12 )×(a - 4)/( a^2 – 4) (a^2 + 5a + 6)/( a^2 - a – 12 )×(a - 4)/( a^2 – 4) = ((a+3)(a+2))/( (a-4)(a+3) )×((a – 4))/( (a+2)(a-2)) = 1/( (a-2)) वरील उदाहरणात a^2 + 5a + 6 चे (a+3)(a+2) हे अवयव पाडले आहेत. a^2 - a – 12 चे (a-4)(a+3) हे अवयव पाडले आहेत. a^2 – 4 चे (a+4)(a-4) हे अवयव पाडले आहेत. अंश व छेदातले सारखे अवयव असल्याने त्यांची किंमत 1 येते. प्रस्तावना उदाहरण 2) x2 – 10x + 21 चे अवयव पाडा पुढील उदाहरणे a3 + b3 चे अवयव a3 – b3 चे अवयव सोपे रूप द्या गुणोत्तरीय बैजीक राशी