त्रिकोणांची एकरूपता

सोडवलेली उदाहरणे

views

2:37
त्रिकोणांचे सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. तर आता आपल्याला शिरोबिंदूच्या ज्या एकास एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात, त्या संगतीत त्रिकोणाची एकरूपता दोन प्रकारे लिहायची आहे. उकल: येथे दोन त्रिकोण दिलेले आहेत. ∆STU एकास एक संगत ∆ XZY (∆STU↔∆XZY) या एकास एक संगतीत एकरूप आहेत. म्हणून आपण या संगतीत त्रिकोणाची एकरूपता दोन प्रकारे लिहू शकतो कशी ते पहा : 1) पहिला प्रकार: येथे ∆STU≅∆ XZY आहे, आणि दुसरा प्रकार: ∆UST≅∆YXZ येथे दिलेल्या आकृतीतील कोनांच्या चिन्हांचे एकास एक संगतीचे बारकाईने निरीक्षण करा. मग आता हीच एकरूपता आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूयात. 2) या त्रिकोणांची एकरूपता जर ∆XYZ≅∆STU असे लिहिले तर बाजू ST≅ बाजू XY असा अर्थ होईल. आणि ते चूक आहे. ∴ ∆XYZ≅∆STU हे लेखन चूक आहे. कारण दिलेल्या आकृतीत समान चिन्हांच्या एकास एक संगतीशी हे विसंगत लेखन आहे.