पेशी व पेशीअंगके

पेशीचे भाग

views

3:29
पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल किंवा पेशीपटल हे पेशीचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. पेशीभित्तिका: पेशीभित्तिका ही एकप्रकारची संरक्षण भिंतच आहे. तसेच हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. पेशीभित्तिका ही शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळून येते. पेशीभित्तिका ही पेशीपटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक असे आवरण आहे. पेशीभित्तिका प्राणीपेशींमध्ये नसते. पेशीभित्तिका ही सेल्युलोज व पेक्टीन ह्या कर्बोदाकांपासून बनलेली असते. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. काही कालावधीनंतर आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरीन, क्युटीन अशी बहुवारिके ही पेशीभित्तिकेत तयार होत असतात. या पेशीभित्तीकेचे मुख्य कार्य म्हणजे पेशीला आधार देणे, पेशीत जाणारे जे अतिरिक्त पाणी आहे ते अडवणे व पेशीचे रक्षण करणे. अशाप्रकारे पेशीभित्तिका हा पेशीतील महत्त्वाचा भाग आहे.