पेशी व पेशीअंगके

पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया

views

2:48
पेशीची उर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया 2 प्रकारच्या आहेत. पेशीय भक्षण व पेशी उत्सर्जन. पेशीय भक्षण: पेशीय भक्षणाचे मुख्य कार्य म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्न व पदार्थ गिळंकृत करणे. ज्यामुळे पेशीचे कार्य योग्य प्रकारे चालेल. पेशी उत्सर्जन: पेशी उत्सर्जनाचे मुख्य कार्य म्हणजे पेशीतील टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे. अशाप्रकारे पेशीची उर्जा वापरून पेशीय भक्षण व पेशी उत्सर्जन या क्रिया चालतात. पेशीची उर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया: पेशीची उर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया 2 प्रकारच्या आहेत. विसरण व परासरण. विसरण: विसरण क्रियेचे मुख्य कार्य म्हणजे ऑक्सिजन (O2) व कार्बन डायऑक्साइड (Co2) सारखे लहान-लहान रेणू हे पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे. परासरण: जास्त पाणी असलेल्या भागांकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून पाण्याचा प्रवास हा परासरण क्रियेद्वारे होतो. परासरण क्रिया घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यात आहेत. समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी द्रावण. यांची आता आपण माहिती घेऊ.