पेशी व पेशीअंगके

पेशीद्रव्य

views

4:37
आता आपण पेशीद्रव्य या भागाची माहीती अभ्यासुया. कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी, पेशीभित्तीका, केंद्रक, पेशीद्रव्य व रिक्तिका यांविषयी कल्पना येते. तर मुलांनो, प्रद्रव्यपटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात. पेशीद्रव्य चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात. या पेशीद्रव्यामुळेच पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येत असते. पेशीअंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग हा पेशीद्रव्य असतो. या पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्त्वे साठवलेली असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पतीपेशीत पेशीद्रव्य कडेला सरकलेले असते. तसेच वनस्पतीपेशीतील पेशीद्रव्यांपेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे जास्त कणयुक्त व दाट प्रमाणात दिसून येते. अशाप्रकारे आपण पेशीद्रव्याविषयी माहीती अभ्यासली.