पेशी व पेशीअंगके

रिक्तिका

views

2:49
आता आपण रिक्तिकाविषयी माहीती अभ्यासुया. वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. प्राणी पेशीत अनेक लहान रिक्तिका असतात. रिक्तिकेमध्ये रंगद्रव्ये, क्षार, शर्केरा व इतरही काही पदार्थ साठवले जातात. म्हणून असे म्हंटले जाते की, “पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे रिक्तिका होय.” या रिक्तिकांचा आकार हा नेहमी बदलत असतो. कारण पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. या रिक्तिकेचे पटल हे एकपदरी आढळून येते. रिक्तिकाचे कार्य: 1) रिक्तिका ह्या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. 2) त्याचप्रमाणे चयापचय प्रक्रियेत तयार झालेले ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी हे साठविण्याचे काम रिक्तिका करतात. 3) प्राणीपेशीमध्ये रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न हे पचनाच्या अगोदर म्हणजेच पचनपूर्व साठवले जाते. 4) वनस्पतीपेशीतील रिक्तिका ह्या पेशीद्रवाने भरलेल्या असतात. म्हणून पेशीला ताठरता व दृढता येते. अशा प्रकारे आपण रिक्तिकेविषयी माहीती अभ्यासली.