रासायनिक बदल व रासायनिक बंध

रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण

views

4:35
रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे मुळचे रासायनिक संघटन बदलते व नवीन पदार्थाचे वेगळे संघटन तयार होते. रासायनिक संघटन होत असताना नेमके काय बदल होतात हे माहीत असले की या बदलांची रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. ही रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र, तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग केला जातो. उदा: लिंबाच्या रसात सोडा टाकला की, लिंबाच्या रसाचे रुपांतर सायट्रिक आम्लात होते, आणि कार्बनडाय ऑक्साईड हा वायू तयार होतो. सायट्रिक आम्ल + सोडिअम बायकार्बोनेट कार्बन डायऑक्साईड + सोडिअम सायट्रेट म्हणजेच आम्ल + आम्लारी CO2 + क्षार ही उदासिनीकरण अभिक्रिया आहे. मुलांनो, एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिताना सर्वप्रथम पदार्थांची नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहावी. हे समीकरण लिहिताना प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थांचे रासायनिक सूत्र लिहिले की रासायनिक समीकरण तयार होते. तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळ पदार्थ हे डाव्या बाजूला तर त्या मूळ पदार्थांपासून तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात. आणि त्यामध्ये बाण ( ) दाखवला जातो. या बाणाचे टोक हे तयार झालेल्या पदार्थांकडे दाखवले जाते व बाणाच्या डाव्या बाजूला असणारे पदार्थ हे अभिक्रियेमध्ये भाग घेणारे असतात. त्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. आणि अभिक्रियेमुळे तयार झालेल्या पदार्थांना उत्पादित असे म्हणतात.