रासायनिक बदल व रासायनिक बंध

रासायनिक बंध

views

3:26
आपण अणूचे अंतरंग या पाठात मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपन व मूलद्रव्याची संयुजा यांमधील संबंध अभ्यासला आहे. राजवायू हे रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक/द्विक पूर्ण झालेले असते. याउलट इलेक्ट्रॉन अष्टक/द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. त्यासाठी ते अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यानंतर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे/द्विकांचे संरुपन प्राप्त होत असते. इलेक्ट्रॉन अष्टक/द्विक पूर्ण करण्याच्या दोन पद्धती आहेत. आयनिक बंध: आयनिक बंध पद्धती समजण्यासाठी आपण सर्वप्रथम सोडिअम व क्लोरिन या मूलद्रव्यांच्या अणूपासून सोडिअम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते अभ्यासूया. परस्परविरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितीक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग असे म्हणतात.