ध्वनी

ध्वनी तरंगांची वारंवारिता

views

3:06
आता आपण ध्वनी तंरंगाची वारंवारिता याविषयी माहिती घेऊ. ध्वनीचे प्रसरण हे तरंगाच्या रूपात होत असते. एक संपीडन व एक विरलन मिळून तरंगाचे एक आवर्तन तयार होते. आकृतीत दाखविल्याप्रमाणे कुठलीही वस्तू कंप पावल्यास हवेमध्ये ध्वनीतरंग निर्माण होतात. विरलन व संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन तयार होते. एका सेकंदामध्ये नादकाट्याच्या बाजू ह्या जितक्या वेळा पुढे मागे होतील तितकी आवर्तने एका सेकंदात तयार होतात. म्हणजेच एका सेकंदात हवेच्या किंवा इतर कोणत्याही माध्यमातून निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनाची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तंरंगाची वारंवारिता होय. ही वारंवारिता SI पद्धतीत हर्ट्झ (Hz) या एककात मोजली जाते. म्हणजेच जर एक सेकंदामध्ये एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारिता 1Hz हर्ट्झ इतकी असते.