ध्वनी

ध्वनी आणि संगीत

views

4:45
संगीत ऐकले की मन प्रसन्न होते. मात्र हे संगीत तयार करताना स्वर व ध्वनीच्या वारंवारितेचा विचार केला जातो. कारण ध्वनीतरंगाची वारंवारिता बदलली की निर्माण होणारा ध्वनी हा वेगवेगळा असतो व ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या वारंवारितेमुळे वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होत असते. स्वरनिर्मिती करण्यासाठी संगीत वाद्यही वेगवेगळी वापरली जातात. चित्रात दाखवल्याप्रमाणे सतार, व्हायोलिन, गिटार यांसारखे तंतुवाद्य, तर बासरी, सनई अशा फुंकवाद्यांचा उपयोग केला जातो. तसेच आपल्या गळयामधूनही वेगवेगळे स्वर निर्माण करता येतात. तंतुवाद्यावर असणाऱ्या तारांवरचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागांची लांबी बोटांनी कमी जास्त करून स्वर निर्मिती करता येते. बासरीसारख्या फुंकवाद्यांमध्ये बोटांनी बासरीची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त करून स्वरनिर्मिती होते. तसेच बासरीमध्ये वापरली जाणारी फुंक बदलूनही वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते.