ध्वनी

ध्वनीक्षेपकापासून ध्वनी निर्मिती

views

3:17
तुम्ही टी.व्ही, टेपरेकार्डर, संगणक यांच्यामधून निघणारा आवाज ऐकला असेल. हा आवाज कशामुळे येतो? लाऊड स्पिकरमुळे. या उपकरणामध्ये लाऊड स्पिकर असतो. त्यालाच ध्वनीक्षेपक असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ध्वनीक्षेपकामध्ये एक कायम चुंबक बसवलेले असते. त्याच्याभोवती तारेचे कुंतल गुंडाळलेले असते. या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला की चुंबकीय क्षेत्र तयार होते. तसेच तुम्हांला माहित आहे की, दोन चुंबक एकमेकांजवळ आणले की त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते. अशाच प्रकारे या ध्वनीक्षेपकामध्ये कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंतल मागे-पुढे हलायला लागते. कुंतलाचे हे हलणे म्हणजेच त्याची वारंवारिता आणि आयाम, त्यातून वाहणारा विद्युतप्रवाह कशाप्रकारे बदलत आहे त्यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनीक्षेपकाच्या पडद्याची मागे-पुढे हालचाल होते.