परिसंस्था

प्रस्तावना

views

4:28
आपल्या आजूबाजूला अनेक सजीव, निर्जीव घटक आहेत, ज्यांच्यामुळे ही परिसंस्था बनलेली आहे हे तुम्हांला माहीतच आहे. मग सांगा बरं तुमच्या सभोवताली तुम्हाला कोण-कोणते घटक आढळून येतात? आपल्या सभोवताली जैविक आणि अजैविक घटक आढळून येतात. जैविक घटकांमध्ये आपल्या सभोवतालचे प्राणी, वनस्पती, कीटक अशा सजीवांचा समावेश होतो. तर अजैविक घटकांमध्ये सूर्यप्रकाश, हवा, वायू, जल, जमीन यांचा समावेश होतो. आपण अन्नासाठी वनस्पतींवर आणि काही प्राण्यांवर अवलंबून असतो. तर ऑक्सिजन, पाणी आणि इतर क्षारांसाठी अजैविक घटकांवर अवलंबून राहावे लागते. हे काही निसर्गात आढळणारे घटक दिले आहेत. त्यांचे तुम्ही सजीव व निर्जीव या गटांत वर्गीकरण करा. सजीव गट: सूर्यफूल, हत्ती, कमळ, शैवाल, गवत, मुंगी, मांजर, नेचे, सिंह. आणि निर्जीव गट: सूर्यप्रकाश, दगड, पाणी, माती, हवा. तर आता आपण या घटकांचा समावेश असणाऱ्या परिसंस्थेविषयी माहिती पाहू या. आपल्या आजूबाजूचे जग हे जैविक व अजैविक घटकांनी बनलेले आहे. सजीव व निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. सजीव, त्यांचा अधिवास व पर्यावरणीय घटक यांचा एकमेकांशी वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध तयार होतो. त्यालाच परिसंस्था असे म्हणतात.