परिसंस्था

परिसंस्थेची रचना

views

2:57
सजीवांना जीवन जगण्यासाठी विविध अजैविक घटकांची गरज असते. तसेच निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता प्रत्येक सजीवानुसार वेगवेगळी असते. एखाद्या सजीवाला किंवा सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते, तर दुसऱ्या जीवाला त्याची गरज नसते. काही झाडांना सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते, तर काही वनस्पती ह्या कमी सूर्यप्रकाशातही चांगल्या पद्धतीने वाढतात. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता या प्रत्येक अजैविक घटकाचा परिसंस्थेमध्ये असणाऱ्या सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होतच असतो. तसेच एखाद्या परिसंस्थेतील सजीवांचे जगणे किंवा त्या सजीवांची संख्या किती असायला हवी? हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर अवलंबून असते. सजीव परिसंस्थेतील अजैविक घटकांचा नेहमी उपयोग करून घेतात. किंवा ते घटक उत्सर्जित करत असतात. त्यामुळेच परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे परिसंस्थेमध्ये असणाऱ्या अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. उदाहरणार्थ, जैविक घटकातील वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साइड घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साइडचे संतुलन राखले जाते.