परिसंस्था

परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया

views

3:51
आकृतीवरून जैविक आणि अजैविक घटकांची आंतरक्रिया व परस्परसंबंध लक्षात येतो. अजैविक घटकांवर उत्पादक म्हणजे वनस्पती अवलंबून असतात. वनस्पतींवर प्राथमिक भक्षक जसे, गाई, म्हशी, हरणे, हत्ती, ससे अवलंबून असतात. त्यावर दुय्यम भक्षक वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गरुड अवलंबून असतात. तर तृतीय भक्षक हे सर्वभक्षक असतात. प्राणी व वनस्पती मृत झाल्यावर सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करतात. आणि पुन्हा उष्णता मुक्त होऊन मुक्त द्रव्यांचे पुनर्चक्रीकरण होते. परिसंस्था ह्या बऱ्याच प्रमाणात गुंतागुंतीच्या असतात. त्यांतील विविध जीवजातींमध्ये संख्यात्मक व गुणात्मक विविधता आढळून येते. आपल्या भारत देशामध्ये उष्णकटीबंधीय भागात असणाऱ्या परिसंस्थेमध्ये काही जातीचे सजीव हे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.