परिसंस्था

वृक्ष एक परिसंस्था

views

3:11
आपण जंगलातील परिसंस्थेविषयी माहिती घेऊ. त्यापूर्वी मला सांगा की, वृक्ष ही स्वतंत्र परिसंस्था आहे का? मोठा वृक्ष हा एक परिसंस्था होऊ शकतो. कारण एका वृक्षावर अनेक प्रजातींचे अधिवास असतात. अनेक प्रकारचे कीटक, पक्षी वृक्षाच्या वेगवेगळ्या भागांत राहत असतात. तसेच अनेक पक्षी हे कीटक खाण्यासाठी वृक्षावर येतात. अनेक प्राणी, पक्षी अन्नासाठी वृक्षाच्या फळांचा, पानांचा उपयोग करतात. कवके, लायकेन, शैवाले या वनस्पती वृक्षांवर वाढत असतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळ्या वृक्षाच्या आधारे तयार होत असतात. म्हणून वृक्ष हा एक स्वतंत्र परिसंस्था आहे असे म्हटले जाते. जंगल परिसंस्था: जंगलामध्ये दाट वृक्ष असतात. जंगल ही एक निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, प्राणी, पक्षी हे एकाच ठिकाणी असतात. तसेच जमिनीत हवेत असणारे असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येतात.