परिसंस्था

जलीय परिसंस्था

views

3:12
जलीय परिसंस्था: पृथ्वीवरील एकूण भागांपैकी जवळपास 71% भू-भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तर 29% इतकाच भाग जमिनीचा आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की, जलीय परिसंस्थेचा अभ्यास करणे हे किती महत्त्वाचे आहे. यात अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेमुळे मानवाला विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधने उपलब्ध होतात. त्यात पाणी हा महत्त्वाचा घटक असतो. जलपरिसंस्थेमध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडी परिसंस्था असे अनेक महत्त्वाचे प्रकार आहेत. पिण्यासाठी गोड्या पाण्याचा उपयोग करतो. या गोड्या पाण्यात अनेक परिसंस्था कार्यरत असतात. त्यात नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेत नदी व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जेचे संक्रमण होते. जलभागाच्या तळाशी असंख्य विघटक असतात. ते वनस्पतीच्या व प्राण्यांच्या मृतशरीरांचे विघटन करून त्याचे अजैविक घटकांत रूपांतर करतात.