क्षेत्रभेट

प्रस्तावना

views

3:36
भूगोल हे शास्त्र असून, मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. या दोन्ही शाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास केला जातो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेमध्ये भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास केला जातो. तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, हवामान, मृदा, वनस्पती, जल आणि भूरचना यांचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष त्या प्रदेशात जाऊन निरीक्षण करून नोंदी करणे याला महत्त्व असते. त्यालाच आपण क्षेत्रभेट असे म्हणतो. भूगोल विषयाचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे सर्वेक्षण पद्धती, नकाशा पद्धती. अशा विविध अभ्यास पद्धतींमधील क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रभेटीमुळे विशिष्ट ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या भौगोलिक घटकांचा व प्रक्रियांचा अनुभव घेता येतो. क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. ती पुढीलप्रमाणे आहे: आपण ज्या कार्यालयाला भेट देणार आहोत त्यांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार करावी लागते. ती आपल्या सोबत असणे गरजेचे असते. तसेच आपल्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्या निदर्शनास आलेल्या छोट्या–मोठ्या बाबींच्या नोंदी ठेवण्यासाठी लागणारी नोंदवही, क्षेत्रभेटीचे पुरावे आपल्या संग्रही असावेत. म्हणून फोटोकॅमेरा, नोंदी लिहून घेण्यासाठी पेन, आराखडे-आकृत्या काढण्यासाठी पेन्सिल, रबर तसेच इतर काही वस्तू आपल्या सोबत असाव्यात.