वजाबाकीने कमी करूया

उदाहरणांचा सराव

views

3:33
आता आपण अशा काही उदाहरणांचा सराव करूया. उदा1) १२ – ८ = ४. इथे ८ पासून १२ पर्यंत उजवीकडे ४ उड्या मारल्या किंवा १२ पासून डावीकडे ८ उड्या मारल्या तरी सारखेच आहे. म्हणजेच १२ – ८ = ४. उदा2) ३२ – १ = ३१. इथे ३२ पासून डावीकडे १ उडी मारली तर ३१ उरले. आणि १ पासून उजवीकडे ३२ पर्यंत उड्या मारल्या तर त्या ३१ झाल्या. म्हणजेच ३२ – १ = ३१ कळले? आता पुढील उत्तरे तुम्ही सांगा. उदा 3)१५ – १० = ? सर इथे १० पासून १५ पर्यंत उजवीकडे उड्या मारल्या. त्या ५ झाल्या. १५ पासून डावीकडे १० उड्या मारल्या तर ५ उरतात. म्हणजेच १५ – १० = ५ छान! पण मला सांगा ४४-४० ही वजाबाकी करताना ४४ पासून ४० उड्या डावीकडे मारणे सोपे की ४० च्या उजवीकडे ४४ पर्यंतच्या उड्या मारणे सोपे? ४० च्या उजवीकडे ४४ पर्यंतच्या उड्या मारणे सोपे. ४४-४० म्हणजे ४० गेले तर उरले किती? ४१,४२,४३,४४ म्हणजे ४. हे सोपे आहे. अशा प्रकारे आपण संख्यारेशेवर उजव्या व डाव्या दोन्ही बाजूने वजाबाकी करू शकतो.