पाढे तयार करूया

२ चा पाढा

views

4:04
या पाठात आपण पाढे तयार करणार आहोत. तर प्रथम आपण २ चा पाढा तयार करू. २ चा पाढा सुरु करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की पाढ्यांमध्ये ‘बे’ म्हणजेच २ असते. आपण पाढा म्हणताना दोन एके दोन किंवा बे एके बे असे वाचन करू शकतो. या पाढ्यामध्ये आपण तीन साते वीस एक असे म्हंटले आहे. आणि तीन साते एकवीस असेही म्हंटले आहे. खर तर या दोघांचाही अर्थ सारखाच आहे. म्हणून तुम्ही हा पाढा म्हणताना दोघांपैकी कोणतेही एकाचेच वाचन करा. पण जर तुम्ही वीस एक, वीस चार, वीस सात असे वाचन केलात तर ते जास्त चांगले असेल.