भूमितीमधील मूलभूत संबोध

प्रस्तावना बिंदू

views

3:41
‘भूमिती’ हा गणिताचा एक भाग आहे , यामध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्या, आकार आणि त्यांचे मोजमाप यांचा अभ्यास करतो. आज आपण भूमितीतील मूलभूत गोष्टी म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल यांची माहिती घेणार आहोत. बिंदू :- आकृती :- जर आपण पेन्सिल, पेन किंवा कंपासचे टोक कगदावर ठेवले तर जी खुण उमटेल त्या आकृतीला ‘बिंदू’ म्हणतात. बिंदू म्हणजेच ठिपका ( .) हे बिंदूचे प्रतीक आहे. नाव :- बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात . उदा. बिंदू’A’ बिंदू ‘P’ बिंदू ‘Q’ किंवा बिंदूS आता आपण बिंदूंची वैशिष्ट्ये पाहू.:- •बिंदूला लांबी रुंदी असे कोणतेही माप नसते. •त्याला कोणताही आकार नसतो. •बिंदूला नाव देण्यासाठी फक्त एकाच इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. आता हे बिंदू कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण प्रथम समजून घेऊ. संपात बिंदू समजा फळ्यावर मी ‘P’हा बिंदू घेतला आणि पट्टीच्या साहाय्याने या बिंदूतून जाणाऱ्या अनेक रेषा काढल्या. पहा अशा किती रेषा एका बिंदूतून काढता येतील? तर ‘एका बिंदूतून अंसख्य रेषा काढता येतात’ •जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपातीरेषा म्हणतात. आणि अशा रेषा ज्या एकाच बिंदूत छेदतात त्या छेदन बिंदुला ‘संपातबिंदू’ म्हणतात. या आकृतीत P हा संपातबिंदू आहे.