त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

प्रस्तावना त्रिकोण

views

3:55
त्रिकोण. मुलांनो, आज आपण त्रिकोणाविषयी माहिती करून घेणार आहोत. आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण पाहतो. त्यातील काही चौकोनी असतात, काही गोल, काही आयताकृती तर काही त्रिकोणी. तर या आकारांपैकी आज आपण त्रिकोणाविषयी माहिती पाहणार आहोत. त्रिकोण :- आपल्याला हे माहीतच आहे की त्रिकोणाला तीन बाजू, तीन कोन आणि तीन शिरोबिंदू असतात. त्रिकोणाची व्याख्या: तीन नैकरेषीय बिंदू, रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. तर शिरोबिंदू , बाजू व कोन हे त्रिकोणाचे घटक आहेत. त्रिकोण PQR चे शिरोबिंदू, बाजू व कोन कोणते ते सांगा बरं ? वि: या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत बिंदू P, बिंदू Q, बिंदू R. आणि याच्या बाजू आहेत बाजू PQ बाजू QR आणि बाजू PR. आणि याचे कोन आहेत PQR ,QRP आणि QPR शि: अगदी बरोबर उत्तरं दिली तुम्ही.