त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

त्रिकोणाचे प्रकार – बाजूंवरून

views

2:51
त्रिकोणाचे प्रकार – बाजूंवरून :- आतापर्यंत तुम्ही त्रिकोण म्हणजे काय ते समजून घेतले. आता आपण हे त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून कसे ओळखायचे ते पाहू. समभुज त्रिकोण :- सम म्हणजे सारखा किंवा समान. आणि भुज म्हणजे बाजू. याचाच अर्थ “ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात.” हा शेजारील त्रिकोण PQR पहा. यावरून तुम्हाला समभुज त्रिकोणाची संकल्पना अधिक स्पष्ट होईल. या त्रिकोणाची बाजू PQ 5 से.मी.cm आहे, बाजू RP ही 5 से.मी. आहे QR, आणि बाजू PQ ही देखील 5 से.मी. च आहे. म्हणजेच या तिन्ही बाजू समान मापाच्या आहेत. म्हणून त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण :- सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन. भुज म्हणजे बाजू. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात”. आता ही त्रिकोण LMN ची आकृती पहा. या त्रिकोणामध्ये बाजू LM, बाजू MN, आणि बाजू NL या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. यातील बाजू LM ची लांबी 4 से.मी. आहे. बाजू MN ची लांबी 3 से.मी. आहे. आणि बाजू NL ची लांबी 4 से.मी. आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या बाजू LM व बाजू NL या दोनच बाजू समान लांबीच्या आहेत. तिसरी बाजू MN ही कमी लांबीची आहे. म्हणून हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण :- विषम म्हणजे सारखे नसलेले. तर “ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात.”