त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म Go Back त्रिकोणाचे उदाहरणे सोडवू views 3:18 आता तुम्हाला समभुज, समद्विभुज आणि विषमभुज त्रिकोण समजले आहेत. तर याचा आपण सराव करू. शि: 1) त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 3 सेमी, दुसऱ्या बाजूची लांबी 4 सेमी आणि तिसऱ्या बाजूची लांबी 5 सेमी. आहे तर हा त्रिकोण कोणता? वि: या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबी भिन्न आहेत. म्हणून हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहे. 2) बरं आता या त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 2.5 सेमी, दुसरी लांबी 2.5 सेमी आणि तिसरी लांबी 2.5 आहे. तर हा त्रिकोण कोणता? वि: समभुज त्रिकोण. कारण याच्या तीनही बाजू समान आहेत. शि: छान! समजा या त्रिकोणाची एक बाजू 4 सेमी, दुसरी बाजू 3 सेमी आणि तिसरी बाजू 3 सेमी असेल तर हा कोणता त्रिकोण असेल? वि: हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल. कारण याच्या दोनच बाजू समान आहेत. शि: आता या त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे2.5 सेमी, 3.5 सेमी आणि 4.5 सेमी आहेत, तर हा कोण कोणता? वि: हा विषमभुज त्रिकोण आहे .कारण याच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. शि: एखाद्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी समजा, अनुक्रमे ७ सेमी, ७ सेमी आणि ७ सेमी असेल तर तो त्रिकोण कोणता असेल ? वि : तो त्रिकोण समभुज त्रिकोण असेल. शि: फारच छान ! म्हणजे तुम्हाला आता या तीनही त्रिकोणांची संकल्पना छान समजली आहे. प्रस्तावना त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार – बाजूंवरून त्रिकोणाचे उदाहरणे सोडवू त्रिकोणांचे प्रकार – कोनांवरून त्रिकोणाचे गुणधर्म