साधी यंत्रे

प्रस्तावना

views

5:12
आपण अनेक प्रकारची यंत्र वापरत असतो. आज आपण साध्या यंत्रांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. “ज्या यंत्रामध्ये एकदोन भाग असतात आणि ज्यांची रचना साधी, सोपी असते, अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात.” दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी अनेक यंत्रे वापरत असतो. साधी यंत्रे आपल्याला सहज हाताळता येतात. साधी यंत्रे बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या वापरासाठी ही यंत्रे वापरत असतो. “शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते.” या म्हणीप्रमाणे युक्तीने कामे करण्यासाठी साधनांची गरज भासते.