समाजातील विविधता

समाजाचे नियमन

views

2:31
समाजाचे व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन रूढी – परंपरांद्वारे होत असे. आता आधुनिक काळात रूढी - परंपरांबरोबरच काही कायदेही करावे लागतात. रूढी – परंपरांपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. समाजातील काही संस्था, संघटना हे नियम करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्था, संघटनाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. समाजातील कामे शिस्तीने व्हावीत, यांसाठी शासन संस्थेची निर्मिती होते आणि सामुदायिक प्रयत्नांतून त्या संघटना कार्यरत राहतात. उदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका.या सर्व शासन संस्था कायद्याच्या मदतीने समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पडतात. आणि त्यामुळेच आपले जीवन सुरळीतपणे चालत राहते.