हवा आणि हवामान

प्रस्तावना

views

3:45
तक्त्याचे नीट निरीक्षण करून कोणत्या राज्यात हवा कशी आहे याविषयी जाणून घेऊ. या तक्त्यावरून आपल्याला कळते की, 10 जून ला भारतातील विवध राज्यांतील शहरांमध्ये एकाच वेळी दु.१२.३० वाजता हवेची स्थिती वेगवेगळी होती. म्हणजे वेळ तीच, पण वातावरणाची स्थिती मात्र वेगवेगळी. काही ठिकाणी ही स्थिती ढगाळ होती, काही ठिकाणी कडक ऊन होते तर काही ठिकाणी थंड हवा व थोडेसेच ऊन होते. असे म्हणतात की, भारतात ७ जूनला मृग नक्षत्र निघाल्या नंतर पाऊस सुरु होतो. म्हणून १० जून हा पावसाळ्याची नुकतीच सुरुवात असलेला दिवस असतो. कोच्चि शहर भारताच्या दक्षिणेकडील केरल राज्यामध्ये आहे. या ठिकाणी पावसाला नुकतीच सुरु झाली असल्याने 10 जूनला वातावरणात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने उनही कडक पडत नाही. आणि त्यामुळे दमट राहतात. लवकर वाळत नाहीत. परंतु, याच्या उलट भोपाळ शहराची स्थिती आहे. हे शहर भारताच्या मध्यभागी आहे. 10 जूनला या ठिकाणी कडक ऊन असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त नसते. म्हणून या ठिकाणचे कपडे ऊन्हात वाळत घातले असता त्या इल पाण्याचे बाष्पात रुपांतर पटकन होते.आणि कपडे लवकर वळतात. मसुरी हे ठिकाण कर्कवृत्ताच्या उत्तरेस म्हणजे वरच्या दिशेला आहे. कर्कवृत्ताच्या उत्तरेला सुर्य किरणे तिरपी पडत असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते. तसेच हा प्रदेश हिमालयीन पर्वत रांगेत असल्याने या ठिकाणाची हवा थंड आणि ऊनही बेताचे असते. त्यामुळे या शहरात कपडे लवकर वाळत नाहीत.