तापमान Go Back समताप रेषा views 4:29 समताप रेषा म्हणजे काय ? तर समान तापमान असणारी दोन ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. तसेच या रेषा अक्षवृत्तांना समांतर असतात. म्हणजेच त्या अक्षवृत्तांना छेदत नाहीत. नकाशातील २५० से. तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. त्यात असे दिसून येईल की, ही रेषा विषुववृत्ताच्या जवळचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार पाहिला असता तो एखाद्या लंबगोलासारखा दिसतो. नकाशातील पिवळा रंग हा खंडांचा म्हणजेच जमिनीचा भाग दर्शवतो आहे. तर निळा रंग हा महासागर म्हणजेच पाण्याचा भाग दर्शवतो आहे. या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार हा खंडांवर जास्त आहे, तर महासागर भागातून तो विस्तार कमी आहे. आता या नकाशावरून तुम्हीच मला सांगा की कोणत्या खंडाच्या भागांवरून ही समताप रेषा जाते ? वि: द. अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांवरुन हि समताप रेषा जाते. बरोबर. पहा पॅसिफिक महासागराच्या खूप कमी भागावर तापमान २५० से.पेक्षा जास्त आहे. आणि या नकाशात पहा ०० से. असलेल्या दोन समताप रेषा आहेत. एक दक्षिण गोलार्धात म्हणजे विषुववृत्ताच्या दक्षिणेला व दुसरी आहे उत्तर गोलार्धात उत्तरेला. तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला दिसून येईल की, दक्षिण गोलार्धातील ०० से. ची समताप रेषाही बरीच सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे. त्याची तुलना उत्तर गोलार्धातील रेषेशी केली असता याच मूल्याची रेषा उ. गोलार्धात बरीच वक्र असलेली दिसून येते. उत्तरेकडील ही रेषा पॅसिफिक महासागराच्या भागात सरळ आहे. परंतु, उ. अमेरिका खंडात प्रवेश केल्याबरोबर ही काहीशी उत्तरेकडे/वरच्या बाजूस वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात प्रवेश केल्यानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह आहेत. त्यामुळे सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसत आहेत. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयकडे म्हणजे खालच्या बाजूस वळते. पुढे पॅसिफिक महासागरात गेल्या नंतर समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे तापमानाचे असमान वितरण जमीन व पाणी यातील तापमानाची असमानता उष्णतेचे वहन व ऊर्ध्वप्रवाह समताप रेषा तापमापक