तापमान

तापमापक

views

3:10
तापमापकचा उपयोग हवेचे तापमान मोजण्यासाठी केला जातो. यामध्ये पारा किंवा अल्कोहोल वापरतात. पारा हे नैसर्गिकरित्या आढळणारे मूलद्रव्य आहे. पाऱ्याचे वैशिष्टय म्हणजे सामान्य तापमानात द्रवरुपात असणारा पारा हा एकमेव धातू आहे. तर अल्कोहोल हे कार्बन, ऑक्सिजन, व हायड्रोजन या अणूंनी तयार झालेले असते.पाऱ्याचा गोठणबिंदू (वजा) – ३९०से. असतो.पाणी ००से.ला गोठते म्हणून ००से.ला पण्याचा बर्फ तयार होतो. म्हणजे याच अंशाला पाणी द्रवरूपातून स्थायूरुपात रूपांतरित होते. त्याच प्रकारे पारा (वजा)–३९०से. ला गोठतो. अल्कोहोल (वजा)–१३००से. ला गोठते. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. म्हणजेच तापमानातील छोट्या – छोट्या बदलांनी यांच्या तापमानातही लगेच बदल होतो. त्यामुळे तापमानातील (वजा)–-३००से. पासून +५५०से. पर्यंतचा फरक या द्रव्यांच्या साहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंशसेल्सिअस(०c) किंवा अंश फॅरनहाइट (०f) या एककात मांडतात.